म्यानमार मध्ये सत्तापालट; राष्ट्रपतीसह वरिष्ठ नेत्यांना अटक, तर देशांची सत्ता..

देशभरात वर्षभर आणीबाणी जाहीर करत देशाची सत्ता लष्कराकडे

म्यानमार मध्ये सत्तापालट; राष्ट्रपतीसह वरिष्ठ नेत्यांना अटक, तर देशांची सत्ता..

भारताचा शेजारील देश म्यानमारमध्ये सोमवारी तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. म्यानमारच्या सैन्याने देशातील सर्वोच्च नेते ऑंग सॅन सू की आणि अध्यक्ष विन मायंट यांच्यासह अनेक वरिष्ठ नेत्यांना ताब्यात घेतले आहे. तसेच देशभरात वर्षभर आणीबाणी जाहीर करत सैन्याने देशात सत्ता काबीज केली. म्यानमारच्या लष्करी टेलिव्हिजनच्या म्हणण्यानुसार, लष्कराकडे आता वर्षभर देशाची सत्ता असणार आहे. लष्कराचे कमांडर-इन-चीफ मिंग ऑंग हॅलिंग यांच्याकडे म्यानमारच्या सत्तेची सुत्र राहणार आहेत.

म्यानमारमधील या राजकीय भूकंपांविषयी तेथील सैन्य म्हणते की, निवडणुकीत झालेल्या घोटाळ्याच्या पार्श्वभूमीवर ही उठाव कारवाई केली आहे. यासह देशाच्या विविध भागात सैन्य तैनात करण्यात आले आहे. म्यानमार मधील मुख्य शहर यांगून मध्ये सिटी हॉलच्या बाहेर सैन्य तैनात केले गेले आहे. जेणेकरून कोणीही या घटनेचा विरोध कोणी करणार नाही.

राष्ट्रपती विन मायंट

म्यानमार मध्ये 50 वर्षापासून होती लष्करी हुकूमशाही
देशात लष्करी हुकूमशाहीला जवळपास 50 वर्षे झाली आहेत. म्यानमारवर बर्‍याच काळापासून लष्करी राजवट होती. 1962 ते 2011 पर्यंत देशात लष्करी हुकूमशाही अस्तिवात होती. २०१० मध्ये म्यानमारमध्ये सार्वत्रिक निवडणुका घेण्यात आल्या आणि २०११ मध्ये म्यानमारमध्ये 'नागरी सरकार' स्थापन करण्यात आले. ज्यामध्ये देशाची सत्ता निवडलेल्या लोकप्रतिनिधी कडे गेली. नागरी सरकार बनल्यानंतरही सत्तेची ताकत नेहमीच सैन्याकडे राहिली होती.

भारतासह अन्य देशांनी केली चिंता व्यक्त
म्यानमारमधील राजकीय घडामोडींबाबत भारताने चिंता व्यक्त केली आहे. भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले की, म्यानमारमध्ये घडलेल्या घटनेचा आम्ही निषेध करतो.
भारतासोबतच अमेरिका, ऑस्ट्रेलियासह अन्य देशांनी या घटनेबद्दल चिंता व्यक्त केली आहे. तसेच म्यानमार लष्कराला कायद्याचा आदर करण्याचे आवाहनही केले आहे.


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.