'नमस्ते संभाजीनगरचे' फलक हटवले, आदित्य ठाकरेंचे का नाही?

भाजपच आक्रमक, टी.व्ही सेंटर येथे छ.संभाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर आंदोलन

'नमस्ते संभाजीनगरचे' फलक हटवले, आदित्य ठाकरेंचे का नाही?

सुमित दंडुके/ औरंगाबाद : छत्रपती संभाजी महाराज राज्याभिषेक दिन या निमित्ताने आज भाजपच्या वतीने शहरात 'नमस्ते संभाजीनगरचे' फलक लावण्यात आले होते. ज्यावर छ.संभाजी महाराज यांचा देखील फोटो होता. हे फलक अनधिकृत ठरवत मनपाने काढुन टाकले, मनपाच्या या कारवाईच्या निेषेधार्थ आज भाजपच्या वतीने टी.व्ही सेंटर येथे छ.संभाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर आंदोलन करण्यात आले.

मनपा आणि पोलीस प्रशासन आमच्या सोबत दुजाभाव करते, असा आरोप खा.भागवत कराड यांनी केला. शहरात पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे येणार म्हणून ठिकठीकाणी मोठे फलक लावण्यात आले आहे, हे फलक मात्र मनपा प्रशासन काढत नाही. मग आम्ही लावलेले छ.संभाजी महाराज यांच्या नावाचे फलक का काढता, असा संतप्त सवालही त्यांनी उपस्थित केला.

यावेळी भाजपच्या पदधिका-यांसह, कार्यकर्त्यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती. मोठ्याने घोषणाबाजी करत हे आंदोलन पार पडले. तसेच कुठलीही अनुचीत घटना घडू नये म्हणुन पोलीसांचा मोठा बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आला होता.


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.