काॅंग्रेसला स्वबळावर सत्तेत आणणार-नाना पटोले

पक्ष स्वबळावर सत्तेत कसा येईल यासाठी प्रयत्न करणार

काॅंग्रेसला स्वबळावर सत्तेत आणणार-नाना पटोले

मुंबईः काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष पद कोणाला मिळेल याची अनेक दिवसांपासून चर्चा रंगलेली आहे. त्यात अनेक नेत्यांचे नाव समोर आले, यातीलच विधानसभा अध्यक्ष आणि काँग्रेस नेते नाना पटोले हे लवकरच महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष होणार असल्याची चर्चा आता सुरु आहे. नाना पटोले यांनी महाविकास आघाडी संदर्भात एक वक्तव्य केले. त्यांच्या या विधानामुळे महाविकास आघाडीतील मतभेद पुन्हा समोर आल्याची चर्चा आहे.

विधानसभेच्या निकालानंतर भाजप आणि शिवसेनेची युती तुटली यानंतर महाविकास आघाडीला सत्तेत येऊन १ वर्ष झाले, विविध मुद्दयांवर मतभेद झाले असले तरी आम्ही एकत्र आहोत असे महाविकास आघाडी सरकार मधील नेते म्हणतात, या दरम्यान नाना पटोले यांनी राज्यात स्वबळावर पक्ष सत्तेत येईल असे म्हटले आहे.

आमच्या पक्षात जे काही संघटनात्मक निर्णय घेण्याचे अधिकार राष्ट्रीय अध्यक्षा सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना आहेत. जी जबाबदारी मिळेल ती प्रामाणिकपणे पार पाडणार आणि महाराष्ट्रात पक्ष स्वबळावर सत्तेत कसा येईल यासाठी प्रयत्न करणार, महाराष्ट्राला पुन्हा वैभव मिळवून देण्याचे काम काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून केले जाईल असे नाना पटोले यांनी म्हटले आहे.


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.