उद्यापासून राष्ट्रीय पोलिओ लसीकरण मोहीम सुरु

राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे अभियान ३० जानेवारी रोजी सकाळी ११.४५ वाजता राष्ट्रपती भवनात काही मुलांना पोलिओ थेंब देऊन या मोहिमेची सुरूवात करणार

उद्यापासून राष्ट्रीय पोलिओ लसीकरण मोहीम सुरु

नवी दिल्ली : कोविड १९ विरूद्ध जगातील सर्वात मोठी लसीकरण मोहिमेपैकी ३१ जानेवारीपासून राष्ट्रीय पोलिओ लसीकरण मोहीम देखील सुरू करणार आहे. ही मोहीम १७ जानेवारीपासून सुरू होणार होती. परंतु, १६ जानेवारीपासून कोविड -१९ लसीकरण मोहीम सुरू झाल्यामुळे याला स्थगिती देण्यात आली होती.

राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे अभियान ३० जानेवारी रोजी सकाळी ११.४५ वाजता राष्ट्रपती भवनात काही मुलांना पोलिओ थेंब देऊन या मोहिमेची सुरूवात करणार आहेत. ही मोहीम २ फेब्रुवारीपर्यंत चालणार आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या जागतिक पोलिओ निर्मुलनाच्या पुढाकारानंतर १९९५ मध्ये पल्स पोलिओ लसीकरण कार्यक्रम सुरू झाला. पोलिओ लसीकरण मोहीम ज्या रविवारी सुरु झाली त्याला राष्ट्रीय लसीकरण दिन म्हणून ओळखले जाते.


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.