इंधन दरवाढी विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचा धडक मोर्चा...

घोषणा देत केंद्र शासनाचा केला निषेध...

इंधन दरवाढी विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचा धडक मोर्चा...

माधव पिटले / निलंगा : केंद्रातील सरकार हे भांडवलदारांच्या हिताचे सरकार असून गॅस, पेट्रोल, डिझेल आणि अनेक जीवनावश्यक वस्तूचे भाव वाढवून सर्वसामान्य लोकांचे कंबरडे मोडण्याचे काम सध्या केंद्र शासन करत आहे. मोठ्या भांडवलदार लोकांच्या हिताचे हे सरकार असून शेतकरी विरोधी सरकार असल्याचा आरोप करत निलंगा शहरातील शिवाजी महाराज चौकातून बंद मोटार सायकली ढकलत थेट उपविभागीय अधिकारी कार्यालयात जाऊन सर्व कार्यकर्त्यांनी केंद्र शासनाच्या अनेक निर्णयाच्या विरोधात घोषणा देत निषेध केला व उपविभागीय अधिकारी यांना केंद्र शासनाविरोधात निवेदन दिले. सर्वसामान्य शेतकरी मजूर यांच्यावर उपासमारीची वेळ आली असून केवळ उद्योगपतींचे भलं करणारे निर्णय घेणारे हे सरकार असल्याचा आरोप करत सर्व मोर्चेक-यांनी घोषणा दिल्या.
ncp-2
यावेळी या धडक मोर्चात राष्ट्रवादी काँंग्रेसचे तालुका अध्यक्ष दिलीप पाटील, मदनसुरीकर, युवाचे तालुकाध्यक्ष उल्हास सुर्यवंशी, शहरअध्यक्ष ईस्माइल लदाफ, सामाजिक न्याय विभाग लातूर जिल्हा अध्यक्ष लक्ष्मण कांबळे, जिल्हा सरचिटणीस उध्दव मेकाले, जिल्हा उपाध्यक्ष हसन चाऊस, महिला आघाडी तालुका अध्यक्ष पानफुलाताई पाटील, तालुका उपाध्यक्ष अमोल माने, महेश चव्हाण, प्रल्हाद पाटील, कोशाबा कांबळे, प्रविण कवटकर, गजानन पाटील, सदाशिव मिरगुडे, प्रशांत जाधव, राजू पठाण, संतोष सुर्यवंशी, सुग्रीव सुर्यवंशी, ओमप्रकाश सुर्यवंशी, अकाश कज्जेवाड, यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वच पदाधिकारी-कार्यकर्ते उपस्थित होते.


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.