माधव पिटले / निलंगा : पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे. पत्रकार हे लोकांच्या वेदना मांडतात, त्यांना न्याय मिळवून देतात. परंतु त्यांच्या सुध्दा वेदना व समस्या असतात त्या आपण सर्व लोकप्रतिनिधींनी जाणून घेऊन डोळस होण्याची गरज असल्याचे मत माजी मंञी तथा आ.संभाजी पाटील निलंगेकर यांनी व्यक्त केले.
निलंगा तालुका पत्रकार संघाच्या संपर्क कार्यालयाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. नवीन पत्रकार संपर्क कार्यालयाची फित कापून त्यांनी उद्घाटन केले. निलंगा पत्रकार संघाच्या वतीने सरस्वतीची मुर्ती देऊन त्यांचा सर्व पत्रकारांनी सत्कार केला.
यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष बाळासाहेब शिंगाडे हे होते, तर प्रमुख पाहूणे अजित माने, चेअरमन दगडू सोळुंके, संजय मिलिंदा लातूरे दोरवे , पो.नि.अनिल चोरमले, पञकार संघाचे अध्यक्ष राम काळगे, सचिव झटींग म्हेञे इत्यादी उपस्थित होते.
पुढे बोलताना निलंगेकर म्हणाले, शहरात नवीन पत्रकार भवन बांधण्यासाठी जागा उपलब्ध करून भव्य पत्रकार भवन बांधू असे अश्वासन यावेळी त्यांनी दिले व संपर्क कार्यालयासाठी ३ लाख रूपयांचा निधी देण्याचा शब्द दिला. तसेच अनेक विषयाला हात घालत त्यांनी शहरातील समस्या व नगरपालिकेने केलेली विकास कामे यावर माहिती दिली. संपूर्ण शहराला चोविस तास पाणी पुरवठा करणारी मराठवाड्यातील एकमेव निलंगा नगरपालिका असल्याची माहिती दिली. पञकार संघाच्या प्रत्येक अडचणीत मी सदैव पाठीशी राहील, पञकार आणि या तालुक्यातील जनतेमुळेच मला राज्याचा मंञी म्हणून काम करण्याची संधी मिळाली हे मी विसरणार नाही.
या कार्यक्रमात नगरसेवक इरफान सय्यद, बांधकाम सभापती महादेव फट्टे, शरद पेठकर, तुकाराम माळी, विष्णू ढेरे, शेषराव ममाळे, अॕड नारायण सोमवंशी, प्रा.दयानंद चोपणे, विलास सुर्यवंशी, अरूण साळुंके आदी प्रमुख मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पञकार संघाचे उपाध्यक्ष माधव पिटले, नाना रामदासी, श्रीशैल्य बिराजदार, विशाल हालकीकर, अभिमन्यु पाखरसांगवे, शिवाजी पारेकर, मोईज सितारी, साजीद पटेल, अयुब बागवान, आदींसह पञकार संघाचे सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले.