मुंबई : देशात सलग बाराव्या दिवशीही पेट्रोल आणि डिझेलची दरवाढ कायम आहे. आज डिझेलची किंमत ३७ वरून ३९ पैशांवर, तर पेट्रोलची किंमत ३८ वरून ३९ पैशांनी वाढ झाली आहे. आजही देशातल्या अनेक शहरामध्ये पेट्रोल शंभरच्या पार पोहोचलं आहे. या दरवाढीसह मुंबईत पेट्रोलचा आजचा दर ९६.९४ तर डिझेलचा दर ८८.०१ रुपयांवर पोहेचले आहेत. पेट्रोल आणि डिझेलचा दर असाच वाढत राहिला तर नागरिकांनी वाहने वापरावी की नाही असा प्रश्न सामान्य नागरिकांना पडला आहे.
**प्रमुख शहरांमधील पेट्रोल, डिझेल आजचे दर **
**पेट्रोल **
नवी दिल्ली :९०.५८
मुंबई : ९६.९४
औरंगाबाद : ९७.४८
डिझेल
नवी दिल्ली : ८०.९७
मुंबई : ८८.०१
औरंगाबाद ८८.४९