सिद्धेश्वर गिरी /सोनपेठ : जिल्ह्यातील दशनाम युवक प्रतिष्ठानच्या वतीने ग्रामपंचायतच्या नवनिर्वाचित सरपंच, सदस्यांचा सत्कार नुकताच करण्यात आला. यावेळी नवनिर्वाचित सरपंच राजेश पुरी खडकवाडीकर यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य केशव गिरी, माधव गिरी, सतीश गिरी, दत्ता गिरी आदींचा सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी कार्यक्रमाचे उदघाटक प्रतिष्ठानचे मार्गदर्शक डॉ.अशोक बन,ज्येष्ठ समाजसेवक विजय भारती,ह.भ.प.माऊली महाराज खडकवाडीकर, प्रतिष्ठानचे अध्यक्ष स्वप्नीलभैया भारती, प्रतिष्ठानचे सचिव श्याम गिरी, प्रतिष्ठानचे प्रवक्ते महेश गिरी, जिल्हा संघटक रमेश भारती, दिलीप गिरी, गंगाखेड तालुकाअध्यक्ष अवधूत पुरी यांसह आदी उपस्थितीत होते.