मुंबई : टूलकिट प्रकरणी संशयित असलेल्या वकील आणि सामाजिक कार्यकर्त्या निकिता जेकब हिला मुंबई उच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाला आहे.निकिता यांच्या विरोधात दिल्ली मध्ये अजामीनपात्र वाॅंट जारी करण्यात आला होता. आता तिला अटकेपासून तीन आठवड्यांसाठी संरक्षण देण्यात आले आहे. या कालावधीत दिल्ली पोलीस निकिताला अटक करू शकत नाहीत.
मुबंई उच्च न्यायालयाने निकिता यांना दिलासा दिला आहे. वस्तुस्थिती पाहाता या गुन्हाचा तपास दिल्ली पोलीस करत गुन्हा सुधा दिल्लीत नोंदवला गेला आहे. असे निरीक्षण न्यायादिशानी नोंदवले आहे.
११ फेब्रुवारी रोजी दिल्ली सायबर क्राइम युनिटच्या अधिकाऱ्यांनी निकिताच्या घराची झडती घेऊन तिचा मोबाइल आणि लॅपटॉप जप्त करण्याबरोबरच तिचा जबाबही नोंदवला. त्यामुळे तिने तपासात सहकार्य केले आणि तिची तयारी होती, हे स्पष्ट होते. त्यानंतर अटक होण्याच्या भीतीने तिने उच्च न्यायालया अर्ज केला. त्यानंतर लगेचच सायबर क्राइम युनिटच्या अर्जावर तीस हजारी कोर्टाकडून तिच्याविरुद्ध अजामीनपात्र अटक वॉरंट निघाले, यावरून तिच्या मनातील अटकेची भीती खरी ठरते. त्यामुळे तिला तीस हजारी कोर्टात जाऊन दाद मागण्यासाठी ट्रान्झिट अटकपूर्व जामीन म्हणून तात्पुरते संरक्षण देणे आवश्यक आहे. त्याअनुषंगाने अटक झाल्यास २५ हजार रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर निकिताला सोडण्यात यावे असे न्यायमूर्ती प्रकाश नाईक यांनी आपल्या आदेशात स्पष्ट केले.