मुंबईः योगगुरू रामदेव बाबा यांच्या पतंजली कंपनीने तयार केली, कोरोनाची औषध 'कोरोनील' ही कोरोनावर प्रभावी असल्याची जाहिरात केल्यामुळे मोठे वाद निर्माण झाले. इंडियन मेडिकल असोसिएशननेही या औषधाविषयी अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. यावर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी याबाबत सरकारची भूमिका मांडली.
पतंजलि की #Coronil दवा की बिक्री को महाराष्ट्र में #WHO, #IMA और अन्य संबंधित सक्षम स्वास्थ्य संस्थानों से उचित प्रमाणीकरण के बिना अनुमति नहीं दी जाएगी। (२/२)
— ANIL DESHMUKH (@AnilDeshmukhNCP) February 23, 2021
रामदेव बाबा यांच्या पतंजलीच्या कोरोनील औषधाच्या वैद्यकीय चाचणीवर 'आयएमए'ने प्रश्न उपस्थित केले आहेत. जागतिक आरोग्य संघटनेने सुद्धा हे औषध करोनावर परिणामकारक असल्याचा पतंजली आयुर्वेदचा चुकीचा दावा फेटाळला आहे. इतक्या घाईने हे औषध बाजारात आणणे आणि दोन ज्येष्ठ केंद्रीय मंत्र्यांनी याला समर्थन देणे योग्य नाही, जागतिक आरोग्य संघटना,आयएमए व इतर संबंधित मान्यताप्राप्त आरोग्य संस्थांकडून योग्य प्रमाणीकरण झाल्याशिवाय कोरोनील या औषधाच्या विक्रीस महाराष्ट्रात परवानगी दिली जाणार नाही असे देशमुख यांनी ट्विटर द्वारे सांगितले.