नागपूर: राज्यातील उच्च-तंत्र शिक्षण खात्याच्या अंतर्गत येणाऱ्या सर्व नवीन व जुन्या शासकीय वसतिगृहाच नामांतर करण्यात येणार आहे. राज्यातील वसतिगृहांना आता 'मातोश्री' हे नाव दिलं जाणार असल्याची माहिती उच्च-तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी नागपुरात वृत्त वाहिन्यांशी बोलताना दिली.
कवी कालिदास संस्कृत विद्यापीठातल्या नवीन मुलीच्या वसतिगृहाच उदघाटन सामंत यांच्या हस्ते पार पडलं. या नवीन वसतिगृहाला विद्यापीठाने 'मातोश्री' हे नावं दिलं आहे. विद्यापीठाच्या या नाव देण्याच्या निर्णयाच मी स्वागत करतो.'आईच प्रेम जे घरा मध्ये मिळत तेच प्रेम वसतिगृहात मिळावं' यासाठी भविष्यात हिच संकल्पना घेऊन राज्यातल्या सर्व नवीन व जुन्या शासकीय वसतिगृहाना 'मातोश्री' हे नाव देण्याचा निर्णय लवकरच घेणार असल्याचे ही सामंत म्हणाले. आता येणाऱ्या काळात उच्च-तंत्र शिक्षण खात्याच्या अंतर्गत येणारे सर्व नवीन व जुने शासकीय वसतिगृह हे 'मातोश्री' या नावानेच ओळखले जातील.