आता पोलिसांवरच ठेवली जाणार हायटेक नजर

आता पोलिसांच्या रात्रगस्तीवर असणार क्यूआर कोडची नजर...

आता पोलिसांवरच ठेवली जाणार हायटेक नजर

सुमित दंडुके / औरंगाबाद : शहरातील पोलिसांनी हायटेक होण्याच्या दृष्टीने पुढचे पाऊल टाकले असून, आता पोलिसांच्या रात्रगस्तीवर क्यूआर कोडच्या माध्यमातून नजर ठेवली जाणार आहे. गस्तीची पारंपरिक पद्धत मोडीत काढून ती अधिक प्रभावी करण्यासाठी पोलीस आयुक्त निखिल गुप्ता यांच्या संकल्पनेतून राज्यात पहिलाच पथदर्शी प्रयोग शहरात राबविला जात आहे. या अभिनव प्रयोगाचे उद्घाटन काल गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या हस्ते झाले आहे.
Q-R-code
लुटमार, चोऱ्या, घरफोड्या अश्या घटनांवर आळा घालण्यासाठी पोलिसांची रात्र गस्त सुरु असते. या गस्तीमुळे अनेक गुन्हेगारांना पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. तसेच शहरातील गुन्हेगारीवर आळा घालण्यातही काही प्रमाणात मदत झाली आहे.
गस्तीवर असलेल्या कर्मचा-यांसाठी काही ठिकाणी एक रजिस्टर ठेवलेले असत. या रजिस्टरवर कर्मचारी ठिकाणाला भेट देण्याची वेळ, तारीख, आणि नाव टाकून सही करत होते. त्यांच्यावर लक्ष ठेवणारे अधिकारीही याच प्रकारे सही करीत होते. आता सगळं जग आधुनिक झालं आहे. आणि म्हणूनच याला तंत्रज्ञानाची जोड देत औरंगाबाद पोलिसांनी क्यूआर कोडवर आधारित गस्तीचा पथदर्शी प्रयोग राबविण्याचा निर्णय घेतला आहे. याची लवकरच अंमलबजावणी शहरात होताना दिसेल.

अशी असेल पद्धती...
शहरातील निश्चित केलेल्या १ हजार ठिकाणांवर क्यूआर कोडचे फलक लावले जातील. गस्तीवर असलेले संबंधित कर्मचारी व तपासणी करणाऱ्या अधिकाऱ्यांना त्याचे स्कॅनिंग करावे लागेल. कोड स्कॅन करताच याची माहिती व वेळ नियंत्रण कक्षाला तात्काळ कळेल. या पद्धतीमुळे रात्रगस्त अधिक परिणामकारक होईल. तसेच गस्तीवर गैरहजर असणाऱ्यांना प्रतिबंध हाेईल.


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.