आता हेलमेट शिवाय गाडी होणार नाही सुरू

अजब जुगाड का गजब यंत्र बनविणारा जुगाडी राजीवचा आगळावेगळा प्रयोग.....

आता हेलमेट शिवाय गाडी होणार नाही सुरू

हणमंत केंद्रे/जळकोट: गाडी चालू,बंद करायची असेल तर चावी लावलीच पाहिजे. मात्र आता गाडी चावी शिवाय सुरू होणार आहे. कारण असचं एक यंत्र बनवलं आहे. जळकोट तालुक्यातील गुत्ती गावच्या आयटीआयचे शिक्षण घेणार्‍या राजीव बळीराम केंद्रे या तरूणाने टाकाऊ व बिनकामी वस्तूंपासून त्याने हे यंत्र बनविले आहे. जे हेलमेटच्या सेन्सर वर गाडी चालू बंद करण्याच काम करणार आहे. त्यांच्या या जुगाडी यंत्रामुळे अपघाताचे प्रमाण कमी होईल अस नाही पण या हेलमेटने अनेकांचे जीव वाचतील अशी प्रतिक्रिया राजीवने एनालायझरशी बोलताना दिली.

जुगाडी राजीवचा नेमका जुगाड काय ते बघूया
या यंत्रामध्ये  राजीवने टाकाऊ असणारा टिव्हीचा सेटअपबाॅक्स, वापरातून फेकून दिलेले केबल, एक ट्रान्समीटर आणि एक रिसीव्हर चा वापर केला आहे.  त्याने हेलमेट मध्ये ट्रान्समीटर आणि आणि दुचाकी मध्ये रिसिव्हर बसविले आहे. जेव्हा आपण हेलमेट गाडीच्या जवळ घेऊन जातो तेव्हा रिसिव्हर ऑन होतो आणि सिग्नल मिळताच गाडी चालू होते. गाडी चालू होताच रिसिव्हरमधून गाडीचे माॅडल कोणते,दुचाकीचे नाव,टायरची स्थिती अशी सर्व माहिती या यंत्राद्वारे सांगितली जाते. जेव्हा गाडी बंद करायची असते तेव्हा पुन्हा हेलमेट रिसिव्हर जवळ नेले की गाडी बंद होते.

राजीव केंद्रे याने  टाकाऊ पासून टिकाऊ आणि ते पण अत्यंत उपयोगी असे हेलमेट बनवले आहे. हेलमेट असेल तरच गाडी चालू होते. तसेच त्या गाडीची पूर्ण माहिती  व सद्यस्थितीत गाडीची परिस्थिती सांगितली जाते.तसेच या यंत्रामध्ये सेन्सर आणि मायक्रोप्रोसेसर बसविल्यामुळे बाईक ची चालू घडामोड आपल्याला समजते.

WhatsApp-Image-2021-01-24-at-9.45.29-AM

दरवर्षी रस्तेे अपघातात हजारो व्यक्तींचा प्राण जात आहे. सरकारने हेलमेटची सक्ती करूनही नागरिक हेलमेट वापरत नाहीत. यामुळे अपघातात अनेकांना आपला जीव गमवावा लागतो. या यंत्रामुळे अपघाताचे प्रमाण कमी होईल असं नाही पण अनेकांचा जीव मात्र वाचेल. अपघातात दुचाकीस्वाराला प्राण गमवावे लागू नये यासाठी हे कमी किमंतीत यंत्र बनविले आहे. या यंत्रासाठी फक्त चारशे ते पाचशे रुपया पर्यत खर्च आल्याची माहिती राजीवने दिली. या यंत्रामुळे आरटीओला हेलमेट सक्तीची गरज भासणार नाही. कारण हेलमेट लावल्याशिवाय गाडीच चालू होणार नाही त्यामुळे हेल्मेट वापरणे गरजेचं आहे. हे यंत्र कुठल्याही वाहनात बसविता येते अशी माहिती राजीवने एनालायझरशी बोलताना दिली.

राजीवची हालाखीच्या परिस्थितीवर मात
  राजीवला लहानपणापासूनच काहीना काही नवीन बनविण्याचा छंद आहे. अगदी सात वर्षाचा असताना वेगवेगळे साहित्य वापरून पिठाची गिरणी बनविली होती पण त्यावेळी ते यंत्र यशस्वी झाले नाही. त्यानंतर त्यांने मोबाईलद्वारे विदयुतपंप चालू बंद करणारे यंत्र तयार केले. गेल्याच वर्षी वायरलेस विदयुत बल्प चालू बंद करणारे यंत्र बनविले होते. आता त्याने हेलमेट द्वारे दुचाकी चालू किंवा बंद करणारे यंत्र बनविले आहे.

तो सतत काही तरी नवीन आणि भन्नाट शोध लावत असतो . त्याला आगळवेगळं करण्याचा छंद आहे. त्याची घरची परिस्थिती हालाखीची असून तो दिवसभर रोजगार करतो आणि मिळालेल्या पैशातून या प्रयोगासाठी खर्च करत असतो. राजीव मध्ये आगळवेगळं करण्याच टॅलेन्ट आहे. या टॅलेन्टला योग्य मार्गदर्शन व आर्थीक मदत मिळाली तर तो निश्चीतपणे तो आगळवेगळा शोध लावेल.
(संपादन- ज्ञानेश्वर पुलगुर्ले)


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.