शिवजयंतीनिमित्त संघाच्या वतीने सघोष मानवंदना

निवडक स्वयंसेवकांच्या उपस्थितीत मानवंदना

शिवजयंतीनिमित्त संघाच्या वतीने सघोष मानवंदना

परभणी : छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने आज सकाळी सघोष मानवंदना देण्यात आली. यावेळी परभणी शहर संघचालक डॉ. रामेश्वर नाईक, कार्यवाह सुरेश देशमुख, राजन माणकेश्वर, घोष प्रमुख मयूर काकडे आदींची उपस्थिती होती.

दरम्यान कोविड-१९ च्या साथीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने यासाठी कमी स्वयंसेवकांची परवानगी दिलेली होती. त्यामुळे निवडक स्वयंसेवकांच्या उपस्थितीत ही मानवंदना देण्यात आली. परभणीत काल रात्रीपासुनच रिमझीम पाऊस पडत आहे. आज सकाळीही पावसाने हजेरी लावली होती. पाऊस सुरु असतानाही नियोजित वेळी ही मानवंदना देण्यात आली. नागरीकांनीही ही मानवंदना पहाण्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा गर्दी केली होती.परभणीतही छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचा ऊत्साह ओसंडुन वाहत आहे. कोविडच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने काही निर्बंध लावलेले आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यालाही आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे. यामुळे गुरुवारी रात्रीपासुन हा पुतळा नयनरम्य दिसत आहे.


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.