शेतकरी आंदोलनात एकाचा मृत्यू

१२ वाजेपर्यंत दिल्लीतील इंटरनेट सेवा बंद

शेतकरी आंदोलनात एकाचा मृत्यू

** नवी दिल्लीः** नवीन कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांकडून जाहीर करण्यात आलेल्या 'ट्रॅक्टर रॅली'ला हिंसक वळण लागले. या आंदोलनादरम्यान दिल्लीतल्या आयकर कार्यालयाजवळ (ITO) एका आंदोलकाचा मृत्यू झाल्याचे समोर येतेय. गोळी लागल्याने या आंदोलकाचा मृत्यू झाल्याचा दावा उपस्थित प्रत्यक्षदर्शींकडून करण्यात येतोय. हा गोळीबार पोलिसांकडून करण्यात आल्याचाही दावा आंदोलकांनी केला आहे. दीन दयाळ उपाध्याय मार्गावर हा दुर्दैवी प्रसंग घडला. या मार्गावर एक ट्रॅक्टरही पलटलेल्या अवस्थेत आढळला आहे. मृत शेतकरी ट्रॅक्टरवर स्वार होता, असे सांगितले जात आहे.

आयकर विभागानंतर दिल्लीतील प्रसिद्ध लाल किल्ल्यामध्येही काही आंदोलनकर्ते ट्रॅक्टर घेऊन घुसल्याचे समोर आले. तसेच काही आंदोलकांनी लाल किल्ल्याच्या तटबंदीवर चढून झेंडा फडकावला.आंदोलकांवर नियंत्रण मिळवणे आता पोलिसांना कठिण होऊन बसल्याचे दिसतेय. आताची चिखडलेली परीसथीती पाहता गृहमंत्र्यानी दिल्लीतील १२ वाजेपर्यंत इंटरनेट सेवा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.तसेच इंडिया गेट कडे जाणारे सर्व रस्ते बंद करण्यात आले आहे. राष्ट्रभवना बाहेरही सुरक्षा वाढवण्यात आली आहे.


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.