माजी खासदारांची ऑनलाईन फसवणूक

बँक खात्यातून ४९ हजार रुपये परस्पर काढून घेतल्याचा खळबळजनक प्रकार...

माजी खासदारांची ऑनलाईन फसवणूक

विजय कुलकर्णी/ परभणी : मोबाईलचे सीमकार्ड रिचार्ज करण्याकरिता अ‍ॅप्लीकेशन डाऊनलोड केल्यानंतर काही क्षणातच बँक खात्यातून ४९ हजार रुपये परस्पर काढून घेतल्याचा खळबळजनक प्रकार माजी खासदार अ‍ॅड. तुकाराम रेंगे यांच्याबरोबर घडला.

दरम्यान, अ‍ॅड. रेंगे यांनी नानलपेठ पोलिस ठाणे गाठून आपली फसवणूक झाल्याची तक्रार काल रात्री दाखल केली. या फसवणुकीच्या प्रकाराबाबत सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अ‍ॅड. रेंगे यांना मंगळवारी एक मॅसेज आला. त्याव्दारे तुमच्या दोन्ही मोबाईलचे सीमकार्ड बंद पडले आहेत. त्यामुळे ते पुन्हा कार्यान्वित करा, असा मॅसेज आला. अ‍ॅड. रेंगे यांनी लगेच सीमकार्ड रिचार्ज करण्याकरिता सोपान फाळके यांना पाठवले. त्याचवेळी अज्ञात व्यक्तीने दोन्ही सीमकार्ड लागलीच चालू करण्यासाठी केवळ १० रुपयांचे रिचार्ज करावे लागेल, असे स्पष्ट केले. त्यासाठी एक अ‍ॅप्लीकेशन डाऊनलोड करून घ्यावे लागेल, अशीही पुष्टी जोडली. त्यामुळे अ‍ॅड. रेंगे यांनी ती सूचना सोपान फाळके यांना सांगितली. तेव्हा सोपान फाळके यांनी सूचनेप्रमाणे अ‍ॅप्लीकेशन डाऊनलोड केले. दहा रुपयांचे रिचार्ज करण्यासाठी त्यांनी एसबीआयच्या डेबिटकार्डचा वापर केला. तेव्हा काही क्षणातच सोपान फाळके यांच्या स्टेट बँकेच्या खात्यावरून ४९ हजार रुपये काढून घेतले असल्याचा मॅसेज आला. या मॅसेजने अ‍ॅड. रेंगे यांना धक्काच बसला. आपली शुध्द फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याबरोबर नानलपेठ पोलिस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. या प्रकरणाचा अधिक तपास पोलिस निरीक्षक कुंदनकुमार वाघमारे हे करीत आहेत.


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.