मुंबईः राज्यपाल आणि राज्यसरकार यांच्या मध्ये वाद काही दिवसानपासून सुरू आहे. संजय राऊत म्हणाले, की राज्यपालान सोबत शितयुद्ध नाही तर खुल वाॅर सुरू आहे. राज्यसरकारचे अनेक निर्णय राज्यपालान मुळे रखडले आहेत. राज्यपाल हे भाजपाच्या दबावात असल्याचा आरोप राऊत यांनी केला. हे खेळ राज्यपालान कडून नाही तर भाजपा कडून खेळला जात आहे .
राज्य सरकारचे अनेक महत्वाचे निर्णय राज्यपालान मुळे रखडले आहे. तसेच राज्य मंत्रिमंडळाच्या शिफारसी स्वीकारणे हे राज्यपालांना बंधनकारण आहे, असे राज्यघटना सांगतेय. असे असतानाही राज्यसरकारने शिफारस केलेल्या १२ आमदारांचा निर्णय राज्यपालांनी प्रलंबित ठेवलाय. ही घटनेची पायमल्ली आहे. याचा अर्थ राज्यपाल हे राजकीय दबावाखाली काम करत आहेत. म्हणून हे खुले युद्ध आहे, शीतयुद्ध नाही. असे संजय राऊत यांनी पत्रकार परिषद मध्ये सांगितले.