नवी दिल्ली : अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होण्यापूर्वीच विरोधी पक्ष मोदी सरकारला घेराव घालण्यासाठी एकत्र आले आहेत. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर कॉंग्रेससह १६ राजकीय पक्षांनी बहिष्कार घालण्याचा निर्णय प्रसिद्धी पत्रिके द्वारे जारी केले आहे.
काॅग्रसेचे नेते गुलाब नवीब आझाद म्हणाले, सरकारने विरोधी पक्षांना विश्वासात न घेता कृषी कायदा मंजूर केला आहे. म्हणून राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर बहिष्कार टाकण्याचं प्रमुख कारण कृषी कायदे हे आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अभिभाषणावर बहिष्कार टाकणाऱ्या पक्षांमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, जेकेएनसी, द्रमुक, तृणमूल काँग्रेस, शिवसेना, समाजवादी पार्टी, राष्ट्रीय जनता दल, सीपीआय (एम), सीपीआय, आययूएमएल, आरएसपी, पीडीप, एमडीएमके, केरळ काँग्रेस, अेआययूडीएफ या राजकीय पक्षांचा समावेश आहे.