सिद्धेश्वर गिरी/सोनपेठः शिवसेनेचे संस्थापक बाळासाहेब ठाकरे यांच्या ९५ व्या जयंतीनिमित्त शिवसेनेच्या सोनपेठ शहर शाखेतर्फे शहरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.या उपक्रमाचे उद्घाटन बाळासाहेब ठाकरे चौकात बाळासाहेब ठाकरे यांच्या भव्य प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमांना सुरुवात करण्यात आली.यावेळी जेष्ठ शिवसैनिकांचा सत्कार करण्यात आला.तसेच श्री रामजन्मभूमीच्या कारसेवेत सहभागी झालेल्या शिवसैनिकांचा सत्कार करण्यात आला.
यामध्ये बाबूलालजी राठोड,सूर्यकांत बर्वे,संतुक परळकर,अशोक चव्हाण,दुर्गादास सरोदे,साहेबराव घुगे,आश्रोबा खरात,वैजनाथ उपरे,दत्तात्रय कदम आदींचा सत्कार करण्यात आला.त्यांनी यावेळी तत्कालीन परिस्थितीबाबतच्या सर्व आठवणी व्यक्त करून बाळासाहेबांवरची निष्ठा व्यक्त केली.
यावेळी शहर व तालुकाभरातील शिवसैनिक,विविध पक्ष संघटनांचे पदाधिकारी यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.यानंतर शहरात विविध ठिकाणी शिवसैनिकांनी जाऊन महालिंगेश्वर विद्यालय येथे वृक्षारोपण,शहरातील सर्व मंदिर व प्रमुख चौकात भगवे झेंडे लावण्यात आले.तसेच शहरातील मारोती मंदिर येथे महाआरतीचे आयोजन देखील करण्यात आले होते.यावेळी शिवसेनेचे रंगनाथ रोडे,शहरप्रमुख कृष्णा पिंगळे,रावसाहेब पांडुळे,भगवान पायघन,जनार्धन झिरपे,संतोष गवळी,अमोल दहिवाळ,गणेश जोशी,आनंद गुजराथी,नागेश जोशी,नितेश लष्करे,बंडू खरात,राम कदम,महादेव काळे,अर्जुन शिंदे,भगवान वाघमारे,प्रशांत लोंढे,अशोक मस्के यांच्यासह पत्रकार सुधीर बिंदू,राजेभाऊ कराड,काँग्रेसचे सैफुला सौदागर,नासेर पठाण आदींची उपस्थिती होती.