प्रद्युम्न गिरीकर/ हिंगोली : येथील जिल्हा वकील संघाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीमध्ये १० मतांच्या फरकाने ॲड. शेषराव पतंगे यांचा विजय झाला. हिंगोली जिल्हा वकील संघाच्या अध्यक्ष-२०२१ पदाकरीता आज खेळीमेळीच्या वातावरणात निवडणूक पार पडली.
या निवडणुकीमध्ये एकुण २५२ मतदारांनी भाग घेतला.२ मते बाद झाली. ॲड.किरण नर्सीकर यांना १९ मते पडली तर ॲड.शेषराव पतंगे यांना १२९ मते पडून ते विजयी झाले. निवडणूक अधिकारी म्हणून ॲड.अनिल तोष्णिवाल, ॲड.गजानन गायकवाड व ॲड.उमेश भाकरे यांनी काम पाहिले. निवडणूक हा केवळ प्रक्रियेचा भाग असून येणाऱ्या वर्षभरामध्ये वकिलांच्या विविध प्रश्न समस्यांसंदर्भात काम करणार असल्याचे प्रतिपादन नवनिर्वाचित अध्यक्ष शेषराव पतंगे यांनी केले. यावेळी मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये पतंगे यांचा सत्कार करण्यात आला.