मुंबई : देशात पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढ कायम आहे. आज डिझेलची किंमत ३३ वरुन ३५ पैशांनी वाढ झाली आहे. तर पेट्रोलची किंमतही ३० वरुन ३१ पैशांनी वाढ झाली आहे. या दरवाढीसह मुंबईत पेट्रोलचा आजचा दर ९६.६२रुपये प्रति लिटर तर डिझेलचा दर ८७.६७ रूपये मोजावे लागत आहे.
पेट्रोल-डिझेल दर अशा प्रकारे तपासा
आजचे पेट्रोल-डिझेलचे दर तुम्ही मोबाईलच्या माध्यमातून देखील जाणून घेऊ शकताय. SMS च्या माध्यमातून देखील तुम्हाला नेहमीचे दर कळू शकतात. इंडियन ऑईलचे ग्राहक RSP लिहून ९२२४९९२२४९ या नंबरच्या माध्यमातून पेट्रोल डिझेलचे दर जाणून घेऊ शकतात. प्रत्येक शहराचा कोड वेगळा आहे. आपण हे आयओसीएल वेबसाईटवरून पाहू शकता. त्याच वेळी, आपल्या शहरातील पेट्रोल डिझेलची किंमत आपण बीपीसीएल ग्राहक RSP ९२२३११२२२२ आणि एचपीसीएल ग्राहक यांना ९२२२२०११२२ संदेश पाठवून जाणून घेऊ शकता. दररोज सकाळी ६ वाजता पेट्रोल-डिझेलचे दर बदलतात. सकाळी ६ वाजल्यापासून नवी दर लागू केले जातात.
**प्रमुख शहरांमधील पेट्रोल, डिझेलचे दर **
**पेट्रोल **
नवी दिल्ली : ९०.१९
कोलकत्ता : ९१.४१
मुंबई : ९६.६२
पुणे : ९६.२५
डिझेल
नवी दिल्ली : ८०.६०
कोलकत्ता : ८४.१९
मुंबई : ८७.६७
पुणे :८५.९८