पिंपरीचे बुलेट चोर पोलिसांच्या ताब्यात

१३ बुलेटसह दोन अन्य दुचाकी जप्त...

पिंपरीचे बुलेट चोर पोलिसांच्या ताब्यात

पिंपरी - पिंपरी-चिंचवड पोलिसांनी वाहन चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. बुलेट चोरी करणाऱ्या दोन तरुणांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून १३ बुलेट आणि दोन अन्य दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. ज्याची किंमत अंदाजे २० लाख ५० हजार इतकी आहे.

पिंपरी-चिंचवड परिसरात वाहन चोरीच्या घटना वाढल्या होत्या. अनलॉक कालावधीत अनेकांनी चोरीचा मार्ग अवलंबला. या घटना रोखण्याचे पोलिसांसमोर आव्हान होते. त्यानुसार, गुन्हे शाखेच्या युनिट तीनच्या पथकाने वाहन चोरीच्या घटनांची माहिती घेतली. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि तंत्रज्ञानाच्या मदतीने पोलिसांनी चोरट्यांचा शोध घेण्यास सुरुवात केली. त्याचवेळी अमोल ढोबळे हा बुलेट चोरी करत असल्याची माहिती पोलिसांच्या हाती लागली. अमोलने चोरलेली बुलेट विकण्यासाठी त्याचे दोन साथीदार मोशी टोलनाका परिसरात येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यावरून पोलिसांनी मोशी टोलनाक्यावर सापळा रचला.

पोलिसांनी संशयावरून आरोपी विशाल मगर (वय २०, रा.अहमदनगर) आणि विशाल खैरे (अहमदनगर) या दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे एक चोरीची बुलेट होती. आरोपींनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरी-चिंचवड, पुणे, नवी मुंबई, ठाणे परिसरातून चोरलेल्या १३ बुलेट आणि दोन महागड्या दुचाकी अशा १५ दुचाकी पोलिसांनी जप्त केल्या. मुख्य आरोपी अमोल ढोबळे याचा पोलीस शोध घेत आहेत.


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.