औरंगाबाद: कॉलेजच्या त्रासामुळे व मानसिक तणावामुळे आत्महत्या करत असल्याचे पत्र लिहून विष घेतल्याची घटना घडली आहे. स्वप्निल विजय लव्हारे या आत्महत्येचा प्रयत्न केलेल्या विद्यार्थ्यावर उपचार सुरू आहेत. हा कमलनयन बजाज नर्सीग कॉलेजमध्ये शिक्षण घेत आहे.
त्याने लिहलेल्या पत्रात- कॉलेजच्या वाढत्या त्रासामुळे व मानसिक तणावामुळे मी माझं जीवन संपवत आहे. तर माझ्या आत्महत्येस कोणालाही जबाबदार धरू नये.
माझ्या घरच्यांना मला समजून घेण्या इतकी वेळ असती तर कदाचित माझे दु:ख व्यक्त केले असते. परंतू कॉलेजच्या सांगण्यापोटी घरच्यांनी आजपर्यत कधीच माझ्यावर विश्वास ठेवला नाही.
मी नर्सीग करण्यासाठी कधीच तयार नव्हतो. कमलनयन बजाज नर्सीग कॉलेज मधून अनेक वेळा मला मानसिक त्रास झाला आहे. पण मी प्रत्येक वेळेस माझ्या शिक्षणापोटी हे सगळं सहन केलं. यापुढे माझी क्षमता संपली असून मी माझे जीवन संपवत आहे.
माझ्या मृत्यूस कोणी जबाबदार नाही. माझे कॉलेज अतिउत्तम आहे त्यापेक्षा माझ्या घरचे जे त्यांच्यावर विश्वास ठेवतात. असं पत्र लिहून स्वप्निलने विष घेतले.
