सुमित दंडुके / औरंगाबाद : शहरात वाढत्या वाहन चोरी घटनांच्या पार्श्वभूमीवर शहर पोलिसांनी तपासणी मोहीम हाती घेतली आहे. अस्पष्ट; तसेच क्रमांक नसलेली वाहने, फॅन्सी नंबर प्लेट आदी वाहनांची तपासणी शहरातील विविध चौकात सुरू आहे.
शहरात सध्या दुचाकी चोरी, मंगळसुत्र चोरी, अल्पवयीन मुलांनी वाहन चालविण्याचे प्रमाण वाढले आहे. हे सर्व थांबविण्यासाठी विशेष पथकाची स्थापना प्रत्येक पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. मात्र, या विशेष पथकांच्या हाती यश लागत नसल्याने आता पोलिस आयुक्तालय हद्दीतील सर्व ठाण्याचे पोलिस अंमलदार व वाहतूक शाखेच्या कर्मचाऱ्यांची संयुक्त पथके तयार करण्यात आली आहेत.
आता दररोज शहरात ठिकठिकाणी १६० मशिनद्वारे वाहनांची कसून तपासणी केली जाणार आहे.