परभणी : छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती प्रबोधनात्मक रीतीने साजरी करण्यासाठी होमिओपॅथिक अकॅडमी ऑफ रिसर्च अँड चॅरिटीज (एचएआरसी) संस्था व अनार्य रूरल डेव्हलपमेंट अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने आनंद नगर येथील झोपडपट्टी भागातील आर्थिक दृष्ट्या दुर्बल व वंचित किशोरवयीन मुली व पालकांसाठी 'वयात येतांना' या विषयावर कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. त्याचे प्रास्ताविक प्रा सुकेशिनी चौधरी यांनी केले.
एचएआरसी संस्थेचे अध्यक्ष डॉ. पवन चांडक यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती प्रबोधनात्मक रीतीने साजरी व्हावी म्हणून एचएआरसी संस्थेतर्फे आज किशोरवयीन मुलींसाठी 'वयात येतांना' या विषयावर किशोरवयीन मुली व महिलांच्या आरोग्यासाठी प्रबोधनात्मक कार्यक्रम आयोजित करण्यात आल्याची माहिती दिली.
प्रा. पद्मा भालेराव यांनी किशोरवयीन मुलींना वयात येतांना होणाऱ्या विविध शारीरिक व मानसिक बदलाविषयी विविध स्लाइड्सद्वारे संवाद साधला. तसेच समाजात अनेक वेळा लहान मुलांना लैगिंक छळ किंवा वाईट प्रसंगांना सामोरे जावे लागते, अशा वेळी 'गुड टच बॅड टच' विषयी माहितीची गरज आहे. या विषयावर प्रा. पद्मा भालेराव यांनी विविध व्हिडियो उदाहरण, हेल्पलाईन, मदत गट आदीविषयी उदाहरण व डेमो दाखवून सविस्तर माहिती दिली. डॉ.आशा चांडक (मासिक पाळी समुपदेशन तज्ञ) यांनी उपस्थित महिला व किशोरवयीन मुलींना स्त्रियांचे आरोग्य, मासिक पाळी व्यवस्थापन, समज, गैरसमज, पाळीतील जननेंद्रियांची स्वच्छता, सॅनिटरी पॅड/सुती कापडाच्या घड्याचा वापर, त्याची योग्य विल्हेवाट यासंदर्भात मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमात 50 किशोरवयीन मुली, पालक, संस्थेचे कार्यकर्ते व समुपदेशक उपस्थित होते.
उपस्थित मुलींना एचएआरसी संस्थेतर्फे सॅनिटरी पॅड व मासिक पाळी व्यवस्थापन माहितीपत्रक वाटण्यात आले. या प्रसंगी अनार्य रूरल डेव्हलपमेंट अकॅडमी च्या मेहरुणीसा, कमल पवार, राजू पवार, नंदकुमार वझुरकर यांची उपस्थिती होती. यशस्वीतेसाठी एचएआरसी संस्थेचे डॉ. पवन चांडक, डॉ. आशा चांडक, प्रा. पद्मा भालेराव, प्रा. अंजली जोशी, प्रा. सुकेशीनी चौधरी, प्रा. विनायक करंडे यांनी आदींनी प्रयत्न केले.
एचएआरसी संस्थेतर्फे प्रबोधनात्मक शिवजयंती साजरी
'वयात येतांना' या विषयावर 50 किशोरवयीन मुलींचे समुपदेशन

Loading...