सा.बां.विभागाला सुचले उशिरा शहाणपण

शेळगाव-शिर्शी-सोनपेठ या रस्त्यावर चक्क मुरूमऐवजी काळी मात

सा.बां.विभागाला सुचले उशिरा शहाणपण

सिद्धेश्वर गिरी/ सोनपेठ: तालुक्यातील रस्त्याला मुहूर्त सापडला खरा मात्र सदरची कामे निकृष्ट दर्जाची होत असल्याने सामान्य नागरिकांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांवर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहेत.तालुक्यात होणारी कामे तरी चांगली कामे करून घेण्यात यावीत अशी अपेक्षा व्यक्त होत असतानाच तालुक्यात मंजूर कामे करण्यास विलंब लावून मलिदा लाटला जात आहे. यात प्रामुख्याने सोनपेठ तालुक्यातील गोदाकाठला जाण्यासाठी रस्ते बरोबर नसल्याने ग्रामीण भागातून यासाठी नेहमी ओरड होत आहे. याचा परिणाम म्हणून विटा,लासीना,लोहिग्राम या रस्त्यावर नाबार्डच्या माध्यमातून पाच उच्च दर्जाची पुले मंजूर करण्यात आली मात्र यातील दोन पुलाची कामे निकृष्ट दर्जाची करण्यात येत आहेत सदरची कामे अद्यापही पूर्ण करण्यात आली नसल्याने विटा व लोहिग्राम येथील ग्रामस्थांची फजिती होत आहे.तर तीन पूलाच्या कामास मुदत संपूनही सुरुवात झाली नसल्याने या मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.तर तालुक्यात रस्त्याच्या कामास देखील काही प्रमाणात सुरुवात झाली आहे.यात खडका ते महातपुरी यादरम्यान करण्यात येत असलेले कामही कोहीनूर कन्स्ट्रक्शन कंपनीच्या माध्यमातून करण्यात येत असल्याची माहीती देण्यात येत आहे मात्र सदरच्या कामावर देखील नियंत्रण ठेवण्यासाठी असणारे अधिकारीच गायब असल्याने रात्रीस खेळ चाले असा प्रकार चालू आहे.एकंदरीत तालुक्यातील रस्त्यासह इतर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या नियंत्रणाखाली सुरू असणारी कामे अत्यंत निकृष्ट दर्जाची करण्यात येत असून याला सार्वजनिक बांधकाम विभागच जबाबदार असल्याची चर्चा होत आहे.

शेळगाव-शिर्शी-सोनपेठ या रस्त्यावर चक्क मुरूमऐवजी काळी माती

तालुक्याच्या विकासास पोषक म्हणून नावलौकिक होत असणाऱ्या सोनपेठ-शिर्शी-शेळगाव या रस्त्याचे कामही अत्यंत निकृष्ट दर्जाचे होत असल्याचे दिसून येतंय यात मुरुमाऐवजी चक्क काळी माती टाकत आहेत.तर रस्त्यावर पाणी टाकत नसल्याने अपघातही होत असल्याने वरिष्ठांनी लक्ष देण्याची मागणी जोर धरत आहे.या रस्त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी शासनाने स्वतंत्र यंत्रणा उभी केली खरी मात्र त्या यंत्रणेलाही कल्याण टोल इन्फ्रास्ट्रक्चर या कंपनीने या चुकीचे काम करण्यात सामील करून घेतल्याने तक्रार करावी तर कोणाकडे?न्याय मिळेल तर कसा?असे प्रश्न निर्माण होत आहेत.यासोबतच येथील नियंत्रण ठेवण्यासाठी नियुक्त केलेले अधिकारी जबाबदारी ढकलुन मोकळे होत आहेत.
चौकट हा रस्ता चांगला करून घेण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या नियंत्रणात एवढे मोठे काम कधीच आले नसल्याने यासाठी स्वतंत्र यंत्रणा देण्यात आली असून या रस्त्याचे दर्जाधिकारी म्हणून आम्ही चुकीचे काम करणाऱ्यावर कार्यवाही करू!


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.