शेतकऱ्यांना जेलमध्ये टाका : अभिनेत्री कंगना रणौत

शेतकऱ्याच्या या आंदोलनावर अभिनेत्री कंगना रणैत ट्विटरवर व्हिडिओच्या माध्यमातून प्रतिक्रिया दिली.

शेतकऱ्यांना जेलमध्ये टाका : अभिनेत्री कंगना रणौत

नवी दिल्ली : गेल्या दोन महिन्यापासून नवीन कृषी कायद्याच्या विरोधात शेतकरी दिल्लीत आंदोलन करत आहेत. आज शेतकर्‍यांकडून ट्रॅक्टर रॅलीला हिंसक वळण लागले आहे. शेतकऱ्याच्या या आंदोलनावर अभिनेत्री कंगना रणैत ट्विटरवर व्हिडिओच्या माध्यमातून प्रतिक्रिया दिली.

कंगना म्हणाली की, लाल किल्ल्याचे फोटो येत आहेत. हे दहशतवादी जे स्वत: ला शेतकरी म्हणतात त्यांना प्रोत्साहन दिले जात आहे. सर्वांसमोर हा तमाशा सुरु आहे, अशी टीका कंगनाने केली आहे. आज जगात आपली थट्टा होत आहे. आपली काहीच इज्जत राहिलेली नाही. जेव्हा दुसऱ्या देशाचा राष्ट्राध्यक्ष देशात येतो तेव्हा काही लोकं नागडं होऊन बसतात. या देशाचे काहीच होणार नाही. कुणी या देशाला एक पाऊल पुढे घेऊन जात आहे, तर काही लोक देशाला दहा पावले मागे खेचत आहेत. त्या सर्व शेतकऱ्यांना जेलमध्ये टाका आणि त्यांचे समर्थन करणाऱ्यांना जेलमध्ये टाका. त्यांची संपत्ती देखील हिसकावून घ्या,

पुढे ती म्हणाली, शेतकऱ्यांच्या या आंदोलनावर बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणैत हिने प्रतिक्रिया दिली आहे. कंगना रणैत म्हणाली की, आज प्रजासत्ताक दिनी लाल किल्ल्यावर हल्ला करण्यात आला. तिथे खलिस्तानचा झेंडा फडकवण्यात आला आहे. कोरोना संकटावर आपण यशस्वी मात करत पुढे गेलो. याशिवाय या संकट काळात आपण पूर्ण जगाचे प्रतिनिधित्व करत आहोत. मोजक्याच देशांना हे यश मिळाले आहे. त्याच देशांपैकी आपण एक आहोत, असे कंगनाने व्हिडिओद्वारे सांगितले.


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.