मटका बुकीवर पुन्हा धाड

रोख रक्कमेसह दोन फोन जप्त लातूर विशेष पथकाची कारवाई

मटका बुकीवर पुन्हा धाड

माधव पिटले/निलंगा : शहरातील दत्त नगर येथील इंद्रभवन भोजनालयाच्या पाठीमागे असलेल्या एका फळाच्या दुकानासमोर रोडवर कल्याण मिलन नावाचा मटका खेळत व खेळवत असताना दोन मटका बुकी चालकावर धाड टाकून त्यांच्याकडून रोख रक्कमेसह दोन फोन असा एकूण ५१ हजार ६४० रूपयांचा  मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई लातूर पोलिस अधिक्षक निखील पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली  विशेष पथकाचे प्रमुख गजानन क्षिरसागर यांनी केली.

याबाबत पोलिस सुञाकडून मिळालेली माहिती अशी की,  दिनांक १६ रोजी  निलंगा शहरातील दत्त नगर येथे मुख्य मटका बुकी चालक इरफान शेख व महेबुब शेख दोघेही (रा. निलंगा) हे कल्याण मिलन नावाचा मटका लोकांकडून पैसे घेऊन खेळवत होते त्याना रंगेहाथ पकडून त्यांच्या कडून एकून रोख रक्कम २५ हजार सहाशे चाळीस व दोन मोबाईल फोन किमंत २६ हजार असा एकूण ५१ हजार ६४० रूपयांचा मुद्देमाल जप्त करून दोन्ही आरोपीवर निलंगा पोलिस ठाण्यात गुन्हा करण्यात आला आहे. पुढील तपास पो.हे.काँ. एस.एच.पडीले हे करत आहेत.

निलंगा शहरात आत्ता पर्यंत मटका अवैध दारू विक्री यावर लातूर विशेष पथकानेच धाडी टाकून कारवाई केली आहे. तसेच शहरासह ग्रामीण भागातील अवैध धंदेवाल्यांना सळो की पळो करण्याचे काम केले आहे, माञ स्थानिक पोलिस अवैध धंदेवाल्यावर कारवाई का करत नाहीत किंवा ते कायम बंद का करत नाहीत असा सवाल जाणकार नागरिक विचारत आहेत.


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.