ऋषिकेश शेवतेकर/मुंबई : राज्यात कोरोनाने पुन्हा डोके वर काढले असून अनेक मंत्र्यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे हे रुग्णालयात उपचार घेत आहेत. कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने तेही चिंतेत दिसून येत आहेत. राजेश टोपे यांनी रुग्णालयातूनच राज्यातील जनतेला पत्र लिहिले असून काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.
— Rajesh Tope (@rajeshtope11) February 22, 2021
राजेश टोपे यांनी पत्राद्वारे लिहिले आहे की, 'गेल्या वर्षभरापासून आपण कोरोना सोबत लढत आहोत. शासनाची खंबीर भूमिका, ठोस उपाययोजना व प्रामाणिक प्रयत्न, जीवाची पर्वा न करता लढणारे अनेक कोरोना योद्धे डॉक्टर, नर्स, आरोग्यसेवक, पोलीस, तसेच स्वच्छता कामगार यांच्यामुळे आपण कोरोना नियंत्रित करु शकलो,' असे म्हणत राजेश टोपे यांनी कोरोना योद्ध्यांचे कौतुक केले आहे.