अयोध्येतील राम मंदिर हे राष्ट्र मंदिर बनावे

रामभक्तांनी या राष्ट्र निर्माणाच्या कार्यातील पावक दुवा ठरावे असे आवाहन हभप योगेश महाराज साळेगावकर सेलू शहरात १० टीम तयार करण्यात आल्या असून यांच्यामार्फत २२ जानेवारी पर्यंत शहरातील प्रत्येक घरी पत्रक वाटप करुन निधी संकलन करणार ...

अयोध्येतील राम मंदिर हे राष्ट्र मंदिर बनावे

विजय कुलकर्णी/परभणी : अयोध्येत उभारण्यात येणारे राम मंदिर हे राष्ट्र मंदिर बनले पाहिजे, यासाठी सर्व रामभक्तांनी या राष्ट्र निर्माणाच्या कार्यातील पावक दुवा ठरावे असे आवाहन हभप योगेश महाराज साळेगावकर यांनी केले आहे. श्रीराम जन्मभूमी निधी संकलन अभियानाच्या सेलू येथील समिती कार्यालयाच्या उदघाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी प्रमुख गुरुवर्य सारस्वत महाराज, कैलास स्वामी, कृष्णा बोरगावकर यांची उपस्थिती होती. जयप्रकाश बिहानी, नंदकुमार बाहेती, हरिभाऊ चौधरी, अशोक अंभोरे, कृष्णा काटे, अभिजित राजुरकर, यांच्यासह शहरातील रामभक्त तसेच राम मंदिर समितीचे सर्व सदस्य उपस्थित होते.

५ आॕगस्ट २०२० रोजी भारतीयांचे स्वप्न साकार होण्याचा मुहूर्त हाती लागला. महंत नृत्यगोपाल दास यांच्यासह देशभरातील विविध आचार्य, संत तसेच सरसंघचालक मोहनजी भागवत, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या ठिकाणी भूमिपूजन करून भव्य राम मंदिराच्या बांधकामाचा श्रीगणेशा केला आहे. या मंदिराच्या उभारणीसाठी सहयोग व सात्विक दान देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. त्यानुसार १५ जानेवारी ते १५ फेब्रुवारी या कालावधीत सर्व गावात श्रीराम जन्मभूमी निधी संकलन अभियान राबविण्यात येत आहे. सेलूत देखील मोठ्या उत्साहात या अभियानाला सुरुवात झाली व कार्यालयाचे उदघाटन करण्यात आले. यासाठी तालुका अभियान प्रमुख डॉ. रवींद्र घोडके, तालुका सहअभियान प्रमुख अनिल वाडकर, तालुका कोषाध्यक्ष डॉ.सचिन मंत्री, कार्यालय प्रमुख विकास पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली सेलू शहरात १० टीम तयार करण्यात आल्या असून यांच्यामार्फत २२ जानेवारी पर्यंत शहरातील प्रत्येक घरी पत्रक वाटप करुन निधी संकलन करणार आहेत. ग्रामीण भागातील प्रत्येक गावात तेथील स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने हे अभियान पूर्ण करणार आहेत. दररोज जमा झालेला निधी बँकेच्या खात्यात जमा केला जाणार आहे. यासाठी इंडिया बँकेत दोन तर बडोदा बँकेत एक अशी मंदिर निधी संकलन खाती उघडण्यात आली आहेत. याच्या माहितीसाठी केशवराज बाबासाहेब मंदिर कॉम्प्लेस येथे कार्यालय सुरु केले असुन त्याचे उदघाटन पार पडले आहे. या कार्यालयातून हे सर्व निधी संकलन अभियान यशस्वी केले जाणार आहे. यासाठी रामभक्तांनी येथे संपर्क करण्याचे आवाहन केले आले.


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.