माधव पिटले/निलंगा: एनडीएतील महत्त्वाचे घटक असलेले केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले निलंगा दौऱ्यावर आले असता त्यांनी राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडेची पाठराखण करणारे विधान केले आहे.त्यांच्या या विधानामुळे नवीन वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.
केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले तालुक्यातील नदी हत्तरगा येथे खाजगी भेटी आटोपून निलंगा मार्गे नांदेडला जात असताना. आरपीआयचे (ए) चे जिल्हा उपाध्यक्ष व त्यांच्या सहकार्याने शहरातील शिवाजी चौकात त्यांचे स्वागत केले. यावेळी पत्रकारांनी राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धंनजय मुंडे यांच्या प्रकरणावर प्रतिक्रिया घेतली असता आठवले म्हणाले मुंडे यांनी राजीनामा देण्याची आवश्यकता नाही. या सर्व प्रकरणावर केंद्रीय सामाजिक न्याय मंत्र्यांनी राज्याच्या सामाजिक न्याय मंत्र्याची पाठराखण केल्याने नवीन वादाला तोंड फोडले आहे.
राज्यात भाजपच्या वतीने सोमवारी धंनजय मुंडेच्या प्रकरणावर राज्यातील महिला आंदोलन करणार आहेत. आठवले यांनी धनजंय मुंडे यांची पाठराखण करणारे विधान केल्याने भाजप व मित्र पक्षात सध्या अलबेल राहिले नाही का अशी चर्चा सुरु आहे.