सिंधुदुर्ग: भाजपचे राज्यसभा खासदार नारायण राणे यांनी वैद्यकिय महाविद्यालय व हॉस्पिटल उभारलं आहे. याच हॉस्पिटलच्या उद्घाटनासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा उद्या रविवारी सिंधुदुर्गात येणार आहेत.
जिल्ह्यातील कुडाळा तालुक्यातील पडगी गावात 70 एकर वर खासगी वैद्यकिय महाविद्यालय व हॉस्पिटल बांधल आहे. मागच्या चार वर्षापूर्वी सिंधुदुर्ग शिक्षण प्रसारक मंडळाच्या महाविद्यालय व हॉस्पिटलच्या बांधकामाला सुरूवात झाली होती. मागच्या काही दशकांपासून सिंधुदुर्ग जिल्हा चांगल्या दर्जाच्या वैद्यकीय सुविधांपासून वंचित आहे असही नारायण राणे यांनी म्हणाले.
आज 6 फेब्रुवारी रोजीच अमित शहांच्या हस्ते उद्घाटनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मात्र आज देशभरात शेतक-यांनी चक्काजाम आंदोलनाची घोषणा केली. त्यामुळे शहांच्या नियोजित कार्यक्रमात बदल करण्यात आला आहे. आता उद्या 7 फेब्रुवारी रोजी अमित शहांच्या हस्ते महाविद्यालय व रूग्णालायचे उद्घाटन होणार आहे. कोकणातील एक मोठे व आक्रमक नेते म्हणून नारायण राणेंची ओळख आहे. मात्र अमित शहांच्या उपस्थितीने राणेंच पक्षातलं महत्त्व वाढणार आहे.