लग्नाचे आमिष, बालिकेवर अत्याचार

पॉस्को, अॅट्रासिटीसह बलात्काराचा गुन्हा वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात दाखल...

लग्नाचे आमिष, बालिकेवर अत्याचार

औरंगाबाद / सुमित दंडुके : लग्नाचे आमीष दाखवून १७ वर्षांच्या मुलीला वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन बलात्कार केल्याची घटना काल उघडकीस आली. या प्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली आहे. हेमंत अंकुश पुंड (वय.२३, रा.अयोध्यानगर, वाळूज महानगर) असे आरोपीचे नाव आहे. त्याच्याविरुद्ध पॉस्को, अॅट्रासिटीसह बलात्काराचा गुन्हा वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे.

वाळूज येथील १७ वर्षीय अल्पवयीन मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार मुलीच्या पालकांनी ३१ जानेवारी रोजी दिली होती. या प्रकरणाचा तपास करताना पोलिसांना माहिती मिळाली की, हेमंत पुंडने तिला पळवून नेले आहे. तो त्या मुलीसह वेगवेगळ्या ठिकाणी राहात असून, ते दोघे सध्या पुण्यात असल्याची खात्रीलायक माहिती पोलिसांना मिळाली. त्यावरून पोलिसांसह महिला कर्मचाऱ्यांनी पुण्यात जाऊन आरोपीला ताब्यात घेतले.

मुलीची वैद्यकीय तपासणी केली असता तिच्यावर बलात्कार झाल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे आरोपीला अटक करून न्यायालयात हजर केल्यावर न्यायालयाने त्याला ११ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
या प्रकरणी वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक सतीश पंडित करत आहेत.


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.