विजय कुलकर्णी/ परभणी : राज्यात महारेशीम अभियान राबविण्यात येत आहे. परभणी जिल्ह्यातही तुती लागवड करून रेशीम कोष निर्मितीसाठी अनुकूल वातावरण आहे. त्यामुळे अधिकाधिक शेतक-यांनी यात १५ फेब्रुवारी पर्यंत नोंदणी करुन सहभाग नोंदवावा, असे आवाहन रेशीम विकास विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.
या योजनेसाठी प्रामुख्याने अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, भटक्या जमाती (एनटी), विमुक्त जमाती (डीटी), दारिद्र्यरेषेखालील कुटुंबे, महिला प्रधान कुटुंबे, शारीरिक अपंगत्व प्रधान असलेली कुटुंबे, भूसुधार योजनेचे कुटुंबे, इंदिरा आवास योजनेचे लाभार्थी, अल्पभूधारक शेतकरी पात्र आहेत. ग्रामपंचायतीचा ठराव आवश्यक शेतक-यांनी महारेशीम अभियानात आपली नाव नोंदणी करून घ्यावी. त्यासाठी सोमवार, १५ फेब्रुवारी ही अंतिम मुदत आहे. त्यासंबंधी ग्रामपंचायतीने ग्रामसभेत नाव नोंदणी झालेल्या शेतक-यांचा ठराव करून २०२१-२२ च्या त्रैमासिक आराखड्यात आराखडा पंचायत समितीमार्फत जिल्हा परिषदेला सादर करणे आवश्यक आहे. शेतक-यांनी या महारेशीम अभियानाचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा रेशीम विकास अधिकारी गोविंद कदम, बापु नरवाडे यांनी केले आहे.