समृद्धी महामार्गाचे नामांतर करा

नागपूर-मुंबई महाराष्ट्र समृद्धी महामार्गाला ‘धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज समृद्धी महामार्ग’ असे नाव देण्याची मागमी.

समृद्धी महामार्गाचे नामांतर करा

नागपुर : सध्या नामांतराचा मुद्दा चर्चेत आहे. शहरांची नावे, प्राणी संग्रालयांची नावे बदलणे हे सुरू आहे. अशातच नागपूर-मुंबई महाराष्ट्र समृद्धी महामार्गाला ‘धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज समृद्धी महामार्ग’ असे नाव देण्याची मागणी छावा क्रांतीकारी सेनेने केली आहे.

महामार्गाच्या कामामुळे कोपरगाव तालुक्यातील शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. महाराष्ट्र शासनाने शेतकऱ्यांची नुकसान भरपाई करावी, अशी मागणी छावा संघटनेने केली आहे. कोपरगाव तहसील कार्यालयासमोर क्रांतीकारी सेनेच्या कार्यकर्त्यांनी उपोषण सुरू केले आहे.

नुकताच औरंगाबाद शहराच्या नामांतराचा मुद्दाही चर्चेत आहे. औरंगाबादचे नाव बदलून संभाजीनगर करण्यात यावे, अशी मागणी होत आहे, गोरवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी संग्रहालयाचे नाव बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी उद्यान नागपूर असे नुकतेच करण्यात आले आहे. यातच आता समृद्धी महामार्गाच्या नामकरणाची सुद्धा चर्चा होत आहे. समृद्धी महामार्गाचे नाव बदलण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.