ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाचे आरक्षण जाहीर

११७ ग्रामपंचायतीच्या सरपंचपदासाठीचे आरक्षण जाहीर

ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाचे आरक्षण जाहीर

विजय कुलकर्णी / परभणी : ग्रामपंचायतीच्या निवडणुका पार पडल्यानंतर आता सरपंचपदाच्या आरक्षणाकडे नुतन सदस्यांचे लक्ष लागले होते. काल तालुक्यातील ११७ ग्रामपंचायतीच्या सरपंचपदासाठीचे आरक्षण जाहीर करण्यात आले.

शहरातील कल्याण मंडपच्या सभागृहात दि. २५ रोजी सरपंचपदाच्या आरक्षणासंदर्भात विशेष सो़डतीचा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी तहसीलदार संजय बिरादार यांच्यासह महसूल अधिकारी उपस्थित होते. यावेळी पहिल्या टप्यातील ८८ व दुस-या टप्यातील म्हणजे जुलै ते सप्टेंबरमध्ये निवडणुका होणा-या २९ ग्रामपंचायतीतील सरपंचपदाचेही आरक्षण निश्चित करण्यात आले.

सरपंचपद सर्वसाधारण गटासाठी खुले

अंगलगाव, जांब, झरी, ब्राह्मणगाव, दामपुरी, एकरूखा तर्फे पेडगाव, इंदेवाडी, कैलासवाडी, किन्होळा, मांडाखळी, मांडवा, नांदगाव खुर्द, पिंगळी कोथाळा, शिर्शी खुर्द, सूरपिंपरी, उखळद, शहापूर, हसनापूर, असोला, पिंगळी, सायाळा खटिंग, तट्टू जवळा, रायपूर, बलसा खूर्द, धसाडी, शिर्शी बुद्रूक, ब्रह्मपुरी तर्फे पाथरी, दिग्रस, तरोडा / ब्रह्मपुरी तर्फे लोहगाव, मांगणगाव, गोविंदपूर / सारंगपूर, पोरवड, धोंडी, नरसापूर या गावांची नावे आहेत.

सरपंचपद सर्वसाधारण महिला खुले

करडगाव, वरपूड, धारणगाव, सोन्ना, वडगाव सुक्रे, शेंद्रा, बोरवंड खुर्द, परळ गव्हाण, पिंपळा, ठोशा, पिंपळगाव सय्यदमिया, साटला, साडेगाव, आनंदवाडी, कोटुंबवाडी, पिंपळगाव टोंग, टाकळी बोबडे, साळापुरी, बाभुळगाव, मटक-हाळा, इटलापूर देशमुख, कुंभारी / कारला, हिंगला, मिर्झापूर, कौडगाव, आंबेटाकळी, जलालपूर/खानापूर तर्फे झरी, नागापूर, नांदगाव बु., सावंगी खुर्द, सिंगणापूर व कारेगाव.

**अनुसूचित जातीसाठी राखीव

-पेगरगव्हाण, देवठाणा, पोरजवळा, ताडलिमला, धर्मापुरी, सहजपूर जवळा, माळसोन्ना, पारवा. अनुसिचीत जाती महिला राखीव
-पिंपळगाव ठोंबरे, पिंपरी देशमुख, बोरवंड बुद्रूक, आर्वी, मुरूंबा, तामसवाडी, टाकळी कुंभकर्ण, वडगाव तर्फे टाकळी**.

**नागरिकांचा मागास प्रवर्ग राखीव
**

भोगाव, उमरी, वांगी, झाडगाव, इस्लामपूर, धार, पान्हेरा / गव्हा, काष्टा, दैठणा, डफवाडी, वाडीदमई, संबर, उजळंबा, पांढरी, सनपुरी / सुलतानपूर, पाथरा.

**नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला राखीव -
**

सांबा, पोखर्णी नृसिंह, पेडगाव, जोडपरळी, टाकळगव्हाण, ताडपांगरी, रहाटी, आळंद (मोहपुरी), आलापूर पांढरी, आमडापूर, ब्रह्मपुरी तर्फे पेडगाव, दुर्डी, समसापूर, बाभळी, मिरखेल व भारस्वाडा अशा प्रकारे सरपंचपदासाठीचे आरक्षण जाहीर करण्यात आले आहे. आता यानंतर निवडणुका झालेल्या गावांमध्ये सरपंचपदासाठीच्या चर्चा रंगु लागल्या आहेत.


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.