सोनपेठ : शहरापासुन जवळच असलेल्या विटा,वाघलगांव, मुदगल,वाणीसंगम परिसरात मध्यरात्रीच्या सुमारास विटा-वाघलगाव येथील मोटार सायकल,एलसीटी टिव्ही,तीन महागडे मोबाईल,२० साड्यासह १५ हजार रोख रक्कम घेऊन चोरटे पसार झाले आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, एकाच रोडवर असणाऱ्या या तीनही गावात चोरी झाल्याने लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. विटा(खु.)येथील बस स्टाॕप समोरील किराणा दुकानदार बबलु सय्यद यांच्या दुकानासमोरुन बजाज कंपनीची अंदाजे ८० हजार रुपये किंमतीची मोटारसायकल तर माजी सरपंच लक्ष्मण भोसले यांच्या घरात कोणी नसल्याचा फायदा घेऊन घरातील २० साड्यासह १५ हजार रु.रोख रक्कम कपाटातील घेऊन चोरट्यानी वाघलगाव येथील विविध चार ठिकाणावरुन तीन मोबाईल,दोन.एल.सीडी टीव्ही चोरी झाली आहे.
यात एकूण अंदाजे २ लाख किंमतीचे मोटारसायकलसह एल.सी.डी,साड्यासह रोख रक्कमेची घरातुन रात्रीच्या सुमारास चोरी झाल्याने गावात भितीचे वातावरण झाले.याप्रकरणी सोनपेठ पोलीसात चोरीची तक्रार दाखल करण्यात आली असून पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीपान शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीनिवास भिकाने बिटजमादार कुंडलिक वंजारे,ओम यादव यांच्यासह पोलीस करत आहेत.