विजय कुलकर्णी/ परभणी : रस्ता सुरक्षा अभियानानिमित्त उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वतीने बुधवार दि. 3 रोजी महारक्तदान शिबीराचे आयोजन केले आहे. रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे विविध उपक्रमांचे आयोजन केले आहे. यात व्याख्यान आणि परिसंवादांचेही आयोजन केले आहे.
या शिवाय शहरात येणा-या मुख्य रस्त्यांवर वाहनचालकांसह प्रवाशांच्या आरटीपीसीआर चाचण्यांचाही स्तुत्य उपक्रम कार्यालयातर्फे घेण्यात आला. रस्ता सुरक्षिततेबाबत विविध ठिकाणी मार्गदर्शन शिबीरांचे आयोजनही केले आहे. आता ऊद्या रक्तदान शिबीराचे आयोजन केले आहे. बुधवारी सकाळी ९:30 वाजता उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात हे शिबीर होणार आहे. या शिबीरात प्रत्येक रक्तदात्यांना कार्यालयातर्फे एक आकर्षक भेट दिली जाणार असल्याची माहीती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी श्रीकृष्ण नकाते यांनी दिली आहे.