विशेष पथकाने जप्त केला वाळूचा ट्रक

सात लाख रुपयांचा ऐवज या कारवाईत पथकाने जप्त केला...

विशेष पथकाने जप्त केला वाळूचा ट्रक

परभणी : शहरातील वसमत रोडवर अवैध वाळूची वाहतुक करणारा ट्रक पोलिस अधीक्षक जयंत मीना यांच्या विशेष पथकाने आज सकाळी जप्त केला.

यावेळी सुमारे ७ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलिस अधीक्षक जयंत मीना यांच्या विशेष पथकातील विश्वास खोले, चंद्रकांत पवार निलेश भुजबळ, सुग्रीव केंद्रे, यशवंत वाघमारे, शंकर गायकवाड, दीपक मुदीराज, अजहर पटेल, अरुण कांबळे, दीपक मुंडे, विष्णू भिसे आदी कर्मचारी मंगळवारी सकाळी गस्त घालत होते. त्यावेळी वसमत रोडवर वाळूची अवैधवाहतुक करणारा एम.एच. १४ डी.जी. ०७३८ क्रमांकाचा ट्रक या पथकाला आढळला. पथकाने ट्रकचालकास वाळूबाबत विचारणा केली. मात्र, ट्रकचालकाने पथकास माहिती देण्यास टाळाटाळ केली. फौजदार विश्वास खोले यांच्यासह कर्मचा-यांनी ट्रक ताब्यात घेतला. नवामोंढा पोलिसांच्या स्वाधीन केला. या प्रकरणी नवामोंढा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आला. सात लाख रुपयांचा ऐवज या कारवाईत पथकाने जप्त केला आहे.


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.