एम. एस. हुलसूरकर/ हुलसूर : हुलसूर परिसरात यावर्षी ज्वारीचे पीक हे चांगल्याप्रकारे बहरलेली आहेत. त्यातच आता शेतक-याची डोके दुखीही वाढली आहे कारण चिमण्या, रान डुक्कर तसेच हरणाच्या त्रासाने शेतकरी त्रस्त झाला आहे.
उभे पीक रातोरात रान डुक्करानी आडवी केली आहेत. ४० ते ५० हरणाची टोळी दिवसा थैमान घालत आहे.तर पहाटे पक्षाा त्रास याला कंटाळून हुलसूर येथील दिपक नाईक यांनी यावर उपाय म्हणून सात एकर ज्वारीच्या पीकासाठी साड्या बांधून उपाय शोधला आहे. हैद्राबाद येथून ४०० साड्या १५ रुपये प्रमाने व ५० ते ६० किलो वायर असे १० ते १२ हजार रुपये खर्च करून ज्वारीच्या पीकाभोवती बांधून काढले. त्यामुळे आता साड्या एकप्रकारे वरदान ठरल्या आहेत. या साड्यामुळे आता डुक्कर व हरण चुकुनही येत नसल्याचे नाईक यांनी सांगितले.
दरवर्षी पेक्षा यंदा वर्षी पाऊस जास्त झाल्याने परिसरात शेतक-यांनी ज्वारी हे पीक मोठ्या प्रमाणात घेतले आहे. या पीकाच्या संरक्षणासाठी विविध प्रकारचे बुजगावणे, भोंगे, बाटल्या तसेच बेंगडचा वापर करत आहेत. त्यामुळे तातपुरते काम भागते पण रात्री मात्र डुक्करे उभ्या पीकाची नासाडी करत आहेत. यावर नाईक यांनी साड्या लावत होणा-या पीकाचे नुकसान थांबवले आहे. त्यामुळे सााड्या आता शेतक-यासाठी वरदान ठरणार आहेत.