२८ फेब्रुवारीपर्यत शाळा बंद

शिक्षकांनी ऑनलाईन साधनांचा वापर करून अध्यापनाचे कामकाज करावे

२८ फेब्रुवारीपर्यत शाळा बंद

परभणी : जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या वाढत असल्यामुळे इयत्ता दहावी व बारावीचे वर्ग वगळून इतर सर्व वर्ग २८ फेब्रुवारीपर्यत बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी आज दिले आहेत.

दरम्यान, इयत्ता दहावी व बारावी व्यतिरीक्त इतर सर्व शिक्षकांनी ऑनलाईन साधनांचा वापर करून अध्यापनाचे कामकाज करावे, असेही आदेशात नमूद केले आहे. परभणी जिल्ह्यात कोरोना बाधीत रुग्णांच्या संख्येत वाढ झालेली आहे. तसेच काही शाळांमध्ये शिक्षक पॉझिटीव्ह आलेले आहेत. कोविड प्रतिबंधात्मक उपाय म्हणून व विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी जिल्ह्यातील सर्व माध्यम व सर्व व्यवस्थापनाच्या शाळेतील इयत्ता पाचवी ते इयत्ता नववी व इयत्ता अकरावीचे वर्ग तात्पुरत्या स्वरूपात 28 फेब्रुवारीपर्यंत बंद करण्यात येत असल्याचे आदेश जिल्हाधिकारी दिपक मुगळीकर यांनी बजावले आहेत. इयत्ता दहावी व बारावीला शिकविणारे शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी नियमित शाळेत अध्यापनाचे कार्य व आवश्यक ती कामे करावित. इतर सर्व शिक्षकांनी शाळेत पुढील आदेश येईपर्यंत ऑनलाईन साधनांचा वापर करून अध्यापनाचे कामकाज करावे, असेही आदेशात नमूद केले आहे.


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.