बचत गट कर्जवाटपासून वंचित

केंद्र शासनाच्या महिला सक्षमीकरण या योजनेलाच केराची टोपली दाखवण्याचा प्रकार

बचत गट कर्जवाटपासून  वंचित

निलंगा/प्रतिनिधी : महिला सक्षमीकरण करणाऱ्या उमेद संस्थेला  निलंगा येथील काही बँकेचे मॕनेंजर खोडा घालत असल्याने गेल्या सहा महिन्यापासून प्रोत्साहनपर कर्जापासून तालुक्यातील बचत गटांची तारांबळ होत आहे.

केंद्र शासन महिला सक्षमीकरण करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत असून त्यानी राष्ट्रीय ग्रामीण जीवनन्नोती अभियान केंद्र व महाराष्ट्र राज्य जीवनन्नोती केंद्र अंतर्गत पंचायत समिती कार्यालयातून उमेद या संस्थेचे काम पाहिले जाते या  संस्था स्थापन केल्याने  महिलांच्या बचत गटांना कर्ज उपलब्ध करून उद्योग व्यवसायाला चालना देण्यासाठी शासन सर्व स्तरावर महिलांना आर्थिक मदत करण्यासाठी बँका व पत संस्था यांना निर्देश दिले आहे.परंतू स्थानिक पातळीवरील बँका आर्थिक चेरीमेरी मिळवण्याच्या उदेशाने कर्ज वाटपाला खोडा घालत आहे. ख-या आर्थाने महिलांना आर्थिक मदतीपासून वंचित ठेवून महिला सक्षमीकरणापेक्षा महिलांना ना उमेद करण्याचे काम काही  बँकेकडू केले जात आहे. निलंगा शहरातील  भारतीय स्टेट बँक आॕफ इंडिया शाखा दत्त नगर निलंगा व उस्तुरी शाखा हे महिला बचत गट प्रोत्साहनपर आर्थिक मदतीच्या ११६ बचत गटाचे प्रस्ताव जाणीवपूर्वक रखडवत ठेवले आसल्याने या बचत गटातील गोरगरीब महिलांची तारांबळ होत आहे.गेल्या ६ महिन्यापासून तालुक्यातील एकाही बचत गटाला संबंधित बँकेने  आर्थसाह्य केले नाही यामुळे केंद्र शासनाच्या महिला सक्षमीकरण या योजनेलाच केराची टोपली दाखवण्याचा प्रकार होत असल्याची तक्रार महिला बचत गटाकडून होत आहे.तरी देखील शासन स्तरावर वंचित महिलांची दखल कोणी घेत नाही.

ग्रामीण भागातील महिला सक्षम व्हायला पाहिजे म्हणून केंद्र शासनाने उमेद या माध्यमातून उद्योग व्यवसाय करून महिला सक्षम होण्यासाठी हि संस्था काढली आहे.माञ राज्य शासनाच्या कुचकामी धोरणामुळे अनेक महिला बचत गट आर्थिक मदत न झाल्याने वंचित राहत आहेत.राज्य शासन व जिल्हा अधिकारी यानी तात्काळ अशा बँकेवर कारवाई करावी व महिलांना कर्ज उपलब्ध करून द्यावे अन्यथा महिलांची प्रतिनिधी म्हणून व पंचायत समिती सभापती या नात्याने मला वरिष्ठाकडे तक्रार करावी लागेल असे प.स.सभापती राधा बिराजदार यांनी सांगितले.


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.