सोनपेठ : तालुक्यातील विटा(बु.) येथे ग्रामपंचायत कार्यालयात सार्वजनिक शिवजयंती साजरी केली. सरपंच बाळासाहेब आरबाड यांच्या हस्ते शिवप्रतिमेचे पूजन करण्यात आले. शिवजयंतीनिमित्त युवकांनी व्यसनाधीनता सोडून छत्रपती शिवरायांच्या रयतेला समाधानी करण्यासाठी प्रयत्नशील राहण्याचे आवाहन आरबाड यांनी केले. यासोबतच सध्या कोरोनासारख्या आजारावर मात करण्यासाठी युवकांनी पुढाकार घेऊन सोशल डिस्टन्स, सॅनिटायझर, मास्कचा वापर करण्याचे आवाहन बाळासाहेब आरबाड यांनी केले. उपसरपंच महादेव हारकाळ यांनीही मनोगत व्यक्त करताना म्हटले की, युवकांनी स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून आपली झलक दाखवण्याचे आवाहन हारकाळ यांनी केले.
यावेळी ग्रामपंचायत सदस्य उत्तमराव हारकाळ,भानुदास तुपसमींदर,बाबासाहेब मालसमिंदर,दत्ता देंडगे,प्रकाशराव हारकाळ,भास्कर आरबाड,दत्तराव आरबाड,माऊली आरबाड, नारायण हारकाळ,कृष्णा नवले,भागवत खुळे,उमेश हारकाळ,विशाल हारकाळ,अवधूत गिरी,सुदाम देवा आरबाड आदींसह ग्रामस्थांची मोठया संख्येने उपस्थिती होती.