औरंगाबाद : वर्षभरापासून कोरोनाचे संकट आहे. त्यामुळे शिवजयंती साजरी करताना राज्य सरकार कडून निर्बंध लावण्यात आले आहेत.सरकारने शिवजयंतीची नियमावली जारी केली आहे. त्यात बदलकरण्याचे निर्णय मुख्यमंत्री घेतील,असे मंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.
शिवजयंती महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. या वर्षी कोरोनामुळे शिवजयंती साधेपणाने साजरी कराण्याचे आव्हान सरकारने केले आहे. यावर शिवप्रेमींनी टिका केली आहे. औरंगाबाद दौऱ्यावर आज मंत्री एकनाथ शिंदे आले होते. त्यांनी अनेक विकास कामाचा आढावा घेतला. तसेच पत्रकारांशी संवाद साधला यावेळी ते म्हणाले शिवजयंतीचे निर्बंध मागे घ्यावे किंवा त्यात सवलत दयावी अशी मागणी सुरू आहे. शिवप्रेमींनी केलेल्या या मागणीचा राज्य सरकार विचार करेल का? असा प्रश्न विचारण्यात आला असताना त्यावर शिंदे म्हणाले, कोरोना प्रदुर्भाव असल्यामुळे सरकारने निर्बध लावण्यात आले आहे. मात्र त्यात काही बदल करणाचा निर्णय मु्ख्यमंत्री उध्दव ठाकरेच घेऊ शकतात.