परभणी : प्रसिद्ध विधिज्ञ, मराठवाडा वैधानिक विकास मंडळाचे माजी अध्यक्ष, शिवसेनेचे ज्येष्ठ नेते अॕड. प्रताप बांगर यांचे आज पहाटे निधन झाले. गेल्या काही महिन्यांपासून ते आजारी होते.
परभणी शहरातील वैकुंठधाम स्मशानभूमीत दुपारी १ वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत. अँड. बांगर संपूर्ण मराठवाड्याच्या विकासासाठीच्या आंदोलनात अग्रेसर होते. मराठवाडा कृषी विद्यापीठ व अन्य विकासाच्या चळवळीत त्यांचे मोठे योगदान होते. अँड. बांगर यांनी राजकीय क्षेत्रात सदैव समाजाभिमुख राजकारण केले. जनमानसात तळमळीचा, सच्चा, प्रामाणिक नेता, कार्यकर्ता म्हणून ते ओळखले जात. जिल्ह्यातील विकासाभिमुख चळवळी, सामाजिक क्षेत्रातील उपक्रमात ते अग्रेसर असत. आदरयुक्त व्यक्तीमत्व अशी त्यांची ओळख होती. त्यांच्या निधनाने हळहळ व्यक्त होत आहे.