शिवसेना नेते अनंत तरे यांचे दीर्घ आजाराने निधन

राजकीय, सामाजिक चळवळीत होतं मोठं योगदान

शिवसेना नेते अनंत तरे यांचे दीर्घ आजाराने निधन

ठाणे : शिवसेनेचे नेते, ठाण्याचे माजी महापौर, माजी आमदार आणि महाराष्ट्र कोळी समाज संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष अनंत तरे यांचं दीर्घ आजाराने निधन झालं. ते ६७ वर्षाचे होते. त्यांच्यामागे पत्नी, मुलगा, विवाहित मुलगी, जावई, सून, नातवंडे आणि भाऊ असा परिवार आहे. अनंत तरे यांना ब्रेन हॅमरेज झाला होता. त्यामुळे त्यांच्यावर ठाण्याच्या ज्युपिटर रुग्णालयात अनेक दिवसांपासून उपचार सुरू होते. आज अखेर त्यांची प्राणज्योत मालवली.

त्यांच्या आकस्मित निधनामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील कोळी समाज,आणि त्यांच्या चाहत्यांवर शोककळा पसरली आहे. उद्या दुपारी २ वाजता ठाण्यात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या निधनामुळे संपूर्ण महाराष्ट्र, ठाणे जिल्हा एका मोठ्या नेत्याला मुकल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.

राजकीय, सामाजिक चळवळीत मोठं योगदान

अनंत तरे हे ठाण्याचे माजी महापौर होते. त्यानंतर २००० मध्ये ते विधान परिषदेवर निवडून गेले होते. २००८मध्ये त्यांची शिवसेना उपनेते म्हणून निवड करण्यात आली.
२०१५ मध्ये त्यांची पालघर जिल्ह्याचे संपर्क प्रमुख म्हणून निवड करण्यात आली होती. ते कोळी समाजाचे नेते होते. शिवाय एकविरा देवी ट्रस्टचेही अध्यक्ष होते.

राजकारणाबरोबरच त्यांचं सामाजिक चळवळीती योगदान मोठं होतं. त्यांच्या जाण्याने संपूर्ण महाराष्ट्र आणि ठाणे जिल्हा, राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्राची मोठी हानी झाली आहे.

सलग तीन वेळा महापौर

ठाण्यात सलग तीन वेळा महापौरपद भूषविण्याचा विक्रम अनंत तरे यांच्या नावावर आहे.
त्यांनी १९९३ मध्ये पहिल्यांदा महापौरपद भूषविलं. त्यानंतर १९९४ आणि १९९५ सालीही महापौरपद भूषविलं होतं. ठाण्यात महापौरपदाची हॅट्रीक साधणारे ते एकमेव नगरसेवक होते. २००० मध्ये विधान परिषदेवर ते निवडून गेले होते. त्यानंतर २००६ मध्येही ते विधान परिषदेसाठी उभे होते. त्यानंतर २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांचं तिकीट कापल्याने ते नाराज झाले होते.

कोण होते अनंत तरे?

कोळी आणि तत्सम आदिवासी समाजाचे ते नेते होते.

अनंत तरे हे शिवसेनेचे फायरब्रँड नेत्यांपैकी एक होते.

त्यांनी ठाणे महापालिकेचे महापौरपद भूषविलं होतं.

ते २००० ते २००६ या दरम्यान विधानपरिषदेवर आमदार होते.

शिवसेनेचा कोळी समाजाता बडा चेहरा अशी त्यांची ओळख होती.

एकविरा देवी ट्रस्टचेही अध्यक्ष होते.

२०१४ मध्ये विधानसभा निवडणूक लढवण्यावरुन त्यांचे शिवसेनेशी मतभेद झाले होते. मात्र त्यांची मनधरणी करण्यात शिवसेनेला यश आलं.

शिवसेनेने २०१५ मध्ये त्यांची पालघर जिल्हा संपर्कप्रमुखपदी नेमणूक केली होती.


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.