विजय कुलकर्णी/परभणी: परभणी तालुक्यातील सर्वात मोठ्या झरी या ग्रामपंचायतीत शिवसेनेचे नेते गजानन देशमुख व डॉ. प्रमोद देशमुख यांच्या नेतृत्वाखालील जनसेवा पॅनलने 17 पैकी 10 जागा पटकावून निर्विवाद वर्चस्व मिळविले आहे.
जनसेवा पॅनल मधून सुुनिल देशमुख, गोदावरी अंभुरे, ज्योती हेडगे, अशोक चोरमले, रेवती जगाडे, दादाराव देशमुख, राहिना इनामदार, केशर मठपती, असिफ कुरेशी, रेश्मा गवळी हे उमेदवार विजयी झाले आहेत, तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी महानगर जिल्हाध्यक्ष अॅड.स्वराजसिंह परिहार व दिलीपराव देशमुख यांच्या नेतृत्वाखाली शिवस्वराज्य पॅनलने 7 जागा पटकाविल्या आहेत. त्यात सुमय्या इनामदार, जनाबाई नन्नावरे,दिलीपराव देशमुख, पुनम मठपती, अभिजीत परिहार, कैलास रगडे, अस्मिता ढाले हे उमेदवार विजयी झाले आहेत.
या ग्रामपंचायतीत चुरशीच्या लढतीत दिलीप देशमुख व मंगेशराव देशमुख सावंत या दोन सख्या चुलत भावात दिलीप देशमुख हे विजयी झाले आहेत.