औरंगाबादेत गोळीबार, तरुण गंभीर जखमी

बुढीलेन भागात रात्री थरार, घटनास्थळी मोठा पोलीस बंदोबस्त

औरंगाबादेत गोळीबार, तरुण गंभीर जखमी

सुमित दंडुके / औरंगाबाद : शहरातील वर्दळीचे ठिकाण असणाऱ्या बुढीलेन भागात रात्री १२ वाजेच्या सुमारास गोळीबारीच्या घटनेने खळबळ उडाली. भंगार व्यवसाय आणि जागेच्या वादातून गोळीबार करून एका तरुणाच्या खुनाचा प्रयत्न काल रात्री करण्यात आला. अब्दुल जब्बार अब्दुल सत्तार (वय.२५, रा.बुढीलेन) असे गोळीबारीत जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे.

बुढीलेनकडून मनपाकडे जाणाऱ्या रस्त्यावर अनेक भंगार व्यावसायिकांचे गोडाऊन आहे. तेथील एक व्यावसायिक राजाभाई मेहबूब यांच्या गोडाऊनमागे जब्बारचे घर आहे. त्याच्या घराकडे जाणारा मार्ग राजाभाईच्या गोडाऊनमधून जातो. या रस्त्यावर कायम राजाभाईच्या भंगाराच्या गाड्या उभ्या असतात. त्यामुळे त्यांच्यात नेहमी वाद होत होते. गुरुवारी मध्यरात्री बारा वाजता त्यांच्यात पुन्हा वाद उफाळला. यावेळी राजाभाईचा मित्र अक्रम शेरखानदेखील उपस्थित होता. जब्बार आणि राजाभाई यांच्यात बाचाबाची वाढताच अक्रमने थेट पिस्तूल काढून जब्बारवर गोळी झाडली. यात पिस्तुलाचा निशाणा हुकला व जब्बारच्या मांडीत गोळी लागली. गोळीबारीचा आवाज झाल्याने परिसरात एकच गोंधळ सुरू झाला. या गोंधळाचा फायदा घेऊन राजाभाई आणि अक्रम दोघेही पसार झाले.

या परिसरात गोळीबार झाल्याचे कळताच पोलीस आयुक्त डॉ.निखील गुप्ता यांच्यासह, पोलीस उपायुक्त निकेश खाटमोडे, सहायक आयुक्त विवेक सराफ, निशिकांत भुजबळ, गुन्हे शाखेचे निरीक्षक अविनाश आघाव, सिटी चौक चे निरीक्षक संभाजी पवार, बेगमपुर्याचे निरीक्षक सचिन सानप सह मोठा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला. तोपर्यंत दोघेही पसार झाले होते. जखमी जब्बारला रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर परिसरात मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.