मुंबई : राज्यात आता कुठे कोरोना कमी होत असताना. मात्र मुंबई पुन्हा कोरोनाचे आकडे वाढताना दिसत आहेत. अशावेळी मुंबईकरांनी काळजी घेतली नाही तर त्यांना पुन्हा एकदा लॉकडाऊनचा सामना करावा लागू शकतो असे संकेत मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिले आहेत.
कोरोना रुगणांची संख्या दुपडीने वाढत असुन मृत्यूचं प्रमाण देखील दिसु लागलं आहे. ट्रेनमध्ये प्रवास करणारे बहुतेक लोक मास्क घालत नाहीत. लोकांनी सावधगिरी बाळगली पाहिजे अन्यथा आपण दुसऱ्या लॉकडाऊनच्या दिशने जाऊ. लॉकडाऊन पुन्हा लागू करावा का नाही हे लोकांच्या हाती आहे. कोरोना रुगणांच्या संख्येत वाढ होत राहिल्यास मुंबई महानगर पालिका व राज्यसरकारला नाईलाजास्तव लॉकडाऊन करावे लागेल अशी भीती मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी व्यक्त केली आहे.