कोलकत्ता : बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांची प्रकृती पुन्हा एकदा खालावली. त्यांना कोलकाताच्या अपोलो हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. आज अचानक छातीत दुखू लागल्याने त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. काही दिवसांपूर्वीच गांगुलीला हृदयविकाराचा झटका आला होता. घरात व्यायाम करताना त्यांच्या छातीत दुखू लागल्याने गांगुलीला तातडीने वूडलॅण्ड्स रुग्णालयात दाखल केलं. तिथे त्यांची अँजिओप्लास्टी करण्यात आली होती. गांगुलीच्या हृदयाच्या तीन रक्तवाहिन्यांमध्ये ब्लॉक झाले होते. त्याची दुसरी एन्जियोप्लास्टी नंतर होण्याची शक्यता डॉक्टरांनी व्यक्त केली होती. त्यानंतर ७ जानेवारी रोजी डिस्चार्ज देण्यात आला होता. त्यानंतर तीन आठवड्याच्या आतच गांगुलीला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे.
सौरव गांगुलींची प्रकृती पुन्हा बिघडली
अचानक छातीत दुखू लागल्याने हॉस्पिटलमध्ये दाखल

Loading...